संमेलनाविषयी माहिती
https://www.baliraja.com/node/2555
प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती
https://www.baliraja.com/rep-regd
कृषी आणि ग्रामीण विकासासाठी शरद जोशी यांच्या विचारांची कास धरली तरच देशाची प्रगती होईल, असे मत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले. सध्या विचारभिन्नतेपेक्षाही विचारशून्यता वाढत असून त्याची चिंता वाटते, असेही गडकरी म्हणाले.
राजंसह प्रकाशनतर्फे वसुंधरा काशीकर-भागवत यांनी लिहिलेल्या ‘शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाले. विनया खडपेकर, सरोज काशीकर, वसुंधरा काशीकर-भागवत आणि राजीव साने या वेळी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष शरद जोशी यांच्यावरील वसुंधरा काशीकर-भागवत यांनी लिहिलेल्या ‘शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री गिरीश बापट, प्रसिद्ध लेखक राजीव साने आणि राजहंस प्रकाशनच्या संपादिका विनया खडपेकर या वेळी उपस्थित होत्या. शेतकरी संघटनेच्या माजी अध्यक्षा आणि माजी आमदार सरोजताई काशीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. शरद जोशी यांचे विचार पक्ष, जात, धर्माच्या भिंती तोडून अशिक्षित सामान्यांच्या मनाला भिडत होते. त्यामुळेच त्यांची आंदोलने ही लोकचळवळीमध्ये रूपांतरित झाली. म्हणूनच जागतिक स्तरावर काम केल्यानंतर ते शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडले गेले ही त्यांची ताकद होती, असे सांगून गडकरी म्हणाले, शेतीमधील गुंतवणूक कमी करून उत्पादन कसे वाढेल या दृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे. शेतीसाठी खुली अर्थव्यवस्था तारक की मारक यावर चर्चा झाली. त्यावेळी खुली अर्थव्यवस्था शेतीला तारणारी ठरेल अशी ठाम भूमिका शरद जोशी यांनी घेतली. मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारताना भारताने सर्वसामान्य माणूसच केंद्रस्थानी ठेवला. माणूस जातीने नाही तर गुणांनी मोठा होतो हे जोशी यांनी सिद्ध केले. राजकीय नेत्यांनी सत्य बोलण्याची धमक दाखवायची की नाही याबाबत पक्षांमध्ये आणि सरकारमध्येही मतभेद आहेत. पण, ज्याला खुर्चीची चिंता नाही तो सत्य बोलण्यास कचरत नाही. बापट म्हणाले, शेतकऱ्यांच्या नावाखाली आजवर अनेकांनी सत्ता उपभोगली पंरतु त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. शेती संशोधनाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. सरोजताई काशीकर म्हणाल्या, समस्यांचे राजकारण करीत आपली पोळी भाजून घेणारे राजकारणी आम्ही आजवर पाहिले. पंरतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पोटतिडकीने काम करणारा शरद जोशी हा नेता लाभाला हे आमचे भाग्य होते. साने म्हणाले, शेतीतील उत्पादकता वाढण्याबरोबरच शेतमालाला हमी भाव मिळवून देणारे, खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन करणारे शरद जोशी हे द्रष्टे नेते होते. वसुंधरा काशीकर-भागवत आणि विनया खडपेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
(लोकसत्तावरुन साभार)