देशातले एकमेव रावेरी - सीतामंदीर
यवतमाळ जिल्ह्यात राळेगावजवळ ‘रावेरी’ नावाच्या खेड्यात भुमीकन्या सीतामाईचे मंदीर आहे. राम नाही. लव,कुश आणि सीता अशा मूर्ती आहेत. शेतकरी संघटनेच्या मा. श्री. शरद जोशींनी त्याचा जीर्णोद्धार केला आहे. आत्मभान आणि आत्मसन्मान जपणारी सीता पुरुषोत्तमाच्या मर्यादा ओळखणारी सीता. अशा एकट्या सीतेचं ते देशातले एकमेव मंदीर आहे.
प्रभूरामचंद्राने सीतामाईचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात सीतामाईचे वास्तव्य होते. लवकुशाचा जन्म होऊन अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवेपर्यंत याच रावेरी गावात सीतेचे वास्तव्य होते.
अयोध्यास्थित राममंदीरासाठी संपूर्ण देशात रामायण-महाभारत घडत असताना रावेरीचे सीतामाईचे एकमेव मंदीर जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, याकडे कुणाचे लक्षही नव्हते. काही वर्षापूर्वी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने या मंदीराच्या जिर्णोध्दाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि मंदीराचे काम पूर्ण केले.
या मंदीराच्या जिर्णोध्दारासाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांनी सिंहाचा वाटा उचलला, प्रथम त्यांनी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला. पण मंदीराची जिर्णावस्था पाहता तो अपुरा पडल्याने स्वतः वैयक्तिक १० लाख रुपये दिले.
मंदीराचे काम जवळ-जवळ पूर्ण झाले आहे.
दि. १५ नोव्हेंबर २०१० रोजी मा. शरद जोशीं यांनी रावेरी येथील सीतामंदीरास भेट देवून पाहणी केली.
त्यांच्यासोबत मा. रवीभाऊ देवांग, मा. वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, गुणवंतराव पाटील, कैलासजी तंवर, रमेश पाटील, नितीन देशमुख, रमेश देशमुख, गंगाधर मुटे आदी उपस्थित होते.
या विषयावर यथावकाश संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आहे.
*********************
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
येथे वाचा.
प्रतिक्रिया
आज सीतानवमी. भूमिकन्या
आज सीतानवमी.
भूमिकन्या सितामाईला दंडवत.
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२
http://www.sharadjoshi.in/Raveri-2