बरं झालं देवा बाप्पा...!!

VDO

---------------------------------------
बरं झालं देवा बाप्पा...!!

सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले
बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥

कर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी
कर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी
तरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ॥

कधी चालुनिया येते कहर अस्मानी
विपरीत शेतीधोरण कधी सुलतानी
कमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ॥

इंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले
शोषणाने शेतकरी खंगुनिया मेले
पोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले ॥

गीत - गंगाधर मुटे
गायक - दत्ता राऊत आणि समूह
----------------------------------------